Skip to content

The God of Small Things PDF in Marathi by Arundhati Roy

आयमेनेममधला मे महिना म्हणजे जिवाची उलघाल… काहिली! लांबलचक पसरलेले, सुस्त, आळसावलेले दिवस… कोरड्याठाक पडलेल्या नदीपात्राच्या काठानं उडणारी उष्ण धूळ… डेरेदार आम्रवृक्षांच्या हिरव्यागार कुशीत लपून घमघमत्या आंब्यांवर तुटून पडणारे कावळे… पिकून उललेली लाल केळी… झाडावरच फुटलेले पिवळेधम्म फणस… आणि उन्हाच्या झळांनी रणरणत्या हवेत दरवळणारा गोडूस वास… या वासाचा मार्ग काढत माश्यांचे थवे घोंघावत येत. कसल्यातरी विचित्र धुंदीत असल्यासारख्या या माश्या खिडक्यांच्या तावदानांवर आपटत आणि रणरणत्या उन्हात जीवघेण्या गिरक्‍्यांचा आकांत मांडून तडफडत मरून जात. निरभ्र, मोकळ्या आकाशाच्या कुशीत मे महिन्यातल्या रात्री

सुस्त, आळसावलेल्या, अधुरेपणाचा शाप असलेल्या दुर्मुखल्या स्वप्नांसारख्या! …पण जून महिना येई, तोच मुळी उसळत्या पावसाचं धसमुसळं तुफान घेऊन… नंतरचे तीन महिने बारा-बादळ आणि बरसत्या पावसाची नुसती धुम्मस! ओथंबलेल्या आकाशात घेरून आलेले काळेभोर ढग थोडेसे उसवबले, तरच सूर्य दिसणार! मधूनच असं लखलखीत ऊन पडलं, की पावसापाण्यानं गारठलेली मुलं घराबाहेर धूम ठोकीत… ओल्याचिप्प अंगणात मग धसमुसळे खेळ रंगत… एकच गलका उठे! …

PDF Name: The God of Small Things PDF
No. of Pages: 483
PDF Size: 3 MB
Language: Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.