[PDF] सावित्रीबाई फुले भाषण PDF in Marathi

PDFPoint is PDF Library where you can get Latest Trending PDF For Free.

PDF Nameसावित्रीबाई फुले भाषण PDF
No. of Pages8
PDF Size0.18 MB
LanguageMarathi
CategoryEducation & Education & Jobs
AuthorUnknown

Link of सावित्रीबाई फुले भाषण PDF

On the next page, you will get your PDF file in PDF Format; if you need software or an App to open and edit this PDF, Install Adobe PDF For PC or Adobe PDF for Mobile.

Short Summary of सावित्रीबाई फुले भाषण PDF

Hello, friends! Here, we’re going to show you all PDFs. Savitribai Phule is a well-known Indian educator and activist for social change. On January 3, 1831, she was born in Naigaon, Bombay Presidency, British India, now in Maharashtra, India.

She worked to help people and was also a well-known poet from Maharashtra. She has done much to help women in India get ahead and change for the better. In 1840, she married Jyotirao Phule. Her husband was a big help to her in many ways.

सावित्रीबाई फुले भाषण PDF / Savitribai Phule Speech in Marathi PDF

आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिनिनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या  जयंती दिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. मैत्रिनिनो  महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची कहाणी तुम्हाला नक्कीच माहित असेल. ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे.सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून पाच किमी अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या, त्या माळी समाजातील होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि जोतिरावांना स्वतःची मुले नव्हती. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते.

ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी १८ शाळा उघडल्या.

असे म्हणतात की, सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत.

सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान  मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले.

त्यावेळी मुलीचा बालविवाह होत व  ती विधवा झाली तर तिचे केस मुंडण करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते . त्यांच्यासाठी  सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात विधवांसाठी केअर सेंटर उघडून महिलांना शिक्षित केले आणि अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करू लागले.

असे म्हणतात की त्यावेळी भयंकर प्लेग पसरला, सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध PDF – 2 (savitribai phule bhashan nibandh)

ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही

बुद्धी असुनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का ?

ओळखलत का मला मी सावित्री. सावित्राबाई ज्योतीराव फुले सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या वयाच्या नव्या वर्षी ज्योतीराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो-करोड़ोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य त्यांना मी शेठजी म्हणायचे फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला माझा हात घर-घर कापत होता या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला शिकवलं मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजीच.

एकदाची शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजीसारखाच मोठा विचार करायला शिकली १ जानेवारी होय. शनिवार दिनांक १ जानेवारी १८४८ ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी | सुरु केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत वाघासारखे जगलात तर नाम होत. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो. घाबरण किंवा  कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनांचा मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती सर्व सामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसाकाय धर्म बुडतो यांचा, इतका तकलादू असू शकतो का धर्म, धर्म माणसासाठी असतो की, धर्मासाठी माणूस.

शेठजी घरोघरी जाऊन मुलीना गोळा करत होते. त्यांच्या आईबापांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवर्याच्या  जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हत ते शिक्षकांना वाळीत टाकण्याच्या धमक्या देत होते शेठजी विचारात पडले मी शेठजीना म्हणाले,

शेठजी कंचा विचार करताय क्या हाय नव्ह म्या ‘शिकविण पोरीना’ असं म्हणून मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर आला तो म्हणाला, ‘ऐ बाई। कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रू  प्यारी आहे की शिकवण कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतीराव पहेलवानांची पत्नी होते. मग उचलला हात आणि दिली त्याच्या थोबाडीत त्याक्षणीच त्याला सुनावल आज समोर आलायस थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अब्रू हरण  बघायला आलेले बघे  त्याची बेअब्रू  झालेली पाहताच तिथून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केल शिव्या दिव्या दगडफेक केली मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.

दिवसा मागून दिवस गेले अंधारात उजेड येत होता लोकांना शिक्षणाच महत्त्व कळू लागलं ४ वर्षातच आमच्या १८ शाळा झाल्या पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर न पडू देणं, सती जाणं या सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या .अश्भयातच भयंकर प्लेग पसरला, आम्हीं  रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मला हि प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाला.

म्हणून म्हणते स्त्रीला शिकू द्या, विचार करू दया कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते व पशुत्व हटते बरं येते ह मी .

जय हिंद जय महाराष्ट्र .

सावित्रीबाई फुले भाषण मराठी PDF (Savitribai Phule Short Speech Marathi) – 3

“किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले।

स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या  लेकिंनी  गिरवले.”

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजनवर्ग व माझ्या सर्व मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडीलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला- वाचायला शिकवले.

महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इ.स.१९४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. मुलांना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड फेक केली. शेणटी फेकून मारले. तरीही त्या उगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या शिक्षणात प्रांती घडवून आणली. ज्योतिरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले. अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *