Skip to content

[PDF] How to Win Friends and Influence People PDF in Marathi by Dale Carnegie

जर या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीतजास्त लाभ घ्यायचा असेल, तर एक अदृश्य गरज आहे. एक अत्यंत आवश्यक आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट, जिचे पालन करणे इतर कोणत्याही नियमापेक्षा किंवा तंत्रापेक्षा जरुरीचे आहे. तुम्ही इतर हजार नियमांचे पालन केले, पण हे तत्त्व पाळले नाहीत, तर हे सगळे व्यर्थ आहे; पण ही गोष्ट जर तुम्ही थेट हृदयापासून केलीत, तर तुम्ही इतर सूचना न पाळताही चमत्कार घडवू शकता. ही गरज कोणती आहे, जी चमत्कार घडवणार आहे? ती गरज आहे, अंत:करणापासून तीव्र इच्छा असण्याची. “मी लोकांशी जास्तीतजास्त सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीन.’

अशी तीव्र इच्छा मनात हवी. ही आंतरिक इच्छा तुमच्या मनात कशी जागेल? त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला हे सतत बजावत राहायला लागेल की, ही तत्त्वे किती महत्त्वाची आहेत. ही तत्त्वे पाळून तुम्ही तुमचे आयुष्य किती समृद्ध, परिपूर्ण आणि पूर्णत्वाने जगत आहात याचे चित्र मनाशी रंगवावे लागेल. तुम्ही तुमच्या मनाशी हे सतत म्हणत राहायचे आहे की, ‘माझी लोकप्रियता, माझा आनंद आणि माझी इतरांना वाटणारी किंमत ही मी लोकांशी कसे वागतो यावरच अवलंबून आहे.’

PDF Name: How to Win Friends and Influence People PDF
No. of Pages: 235
PDF Size: 2MB
Language: Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.