Skip to content

Best Marathi Vyakaran PDF Free Download

स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले (म्हणजेच विवृत असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.

आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्या वेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदा. ‘सूर्य उदय झाला.’ असे न म्हणता ‘सूर्योदय झाला.’ असे आपण सहज बोलून जातो. ‘इति आदी’ न म्हणता आपण ‘इत्यादी’ असा शब्द बनवतो. ‘वाक् मय’ याच्याऐवजी ‘वाङ्मय’ असा एक शब्द तयार करून आपण बोलतो.

अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दत एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

PDF Name: Best Marathi Vyakaran PDF Free Download
No. of Pages: 89
PDF Size: 3.58 MB
Language: Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.